Sunday, 20 July 2025

श्री गुरुचरित्र पारायण


 गुरुचरित्र : 

पारायणाच्या प्रारंभी करावयाचा संकल्प
(प्रथम दोन वेळा आचमन करावे.)

ॐ श्रीमन्महागणाधिपतये नमः । इष्टदेवताभ्यो नमः । कुलदेवताभ्यो नमः । ग्रामदेवताभ्यो नमः । वास्तुदेवताभ्यो नमः । श्रीपाद्श्रीवल्लभाय नमः । श्रीसद्‍गुरुनृसिंहसरस्वत्यै नमः ।

सर्वेभ्यो देवेभ्यो, ब्राह्मणेभ्यो नमो नमः । मातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः । निर्विघ्नमस्तु ।

सुमुखश्चैकदंतश्च कपिलो गजकर्णकः । लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ।

धूम्रकेतुर्गणाध्यक्शो भालचंद्रो गजाननः । द्वादशैत्तनि नामानि यः पठेच्छृणुयादपि ।

विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा । संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ॥

शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं । प्रसन्नवदनं ध्यायेत्‍सर्वविघ्नोपशान्तये ।

सर्वमङ्‍लमाङ्‍गल्ये शिव सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते ।

सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषांमङ्गलम् । येषां ह्रदिस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः ॥

तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्‍घ्रियुगं स्मरामि ॥ लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः । येषामिन्दीवरश्यामो ह्रदयस्थोजनार्दनः ॥

विनायकं गुरुं भानुं ब्रह्माविष्णुमहेश्वरान् । सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये ॥

अभीप्सितार्थसिद्‍ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ॥

सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः । देवा दिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः ॥

श्रीमद्‍भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मनो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जंबुद्विपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिण तीरे शालिवाहनशके अमुकनाम संवत्सरे
अमुकायने अमुकऋतो अमुकमासे अमुकपक्षे अमुकतिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे विष्णुयोगे विष्णुकरणे अमुकस्थिते वर्तमाने चन्द्रे अमुकस्थिते श्रीसूर्ये अमुकस्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानास्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकरणे
एवंगुणविशेषणविशिष्टाया शुभपुण्यतिथौ

(येथे पूजा करणाराने स्वतः म्हणावे, अमुक या ठिकाणी योग्य शब्द वापरावेत.)

मम आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थम् । अखण्डलक्ष्मीप्राप्त्यर्थम् सकलारिष्टशान्त्यर्थम् । श्रीपरमेश्वरश्रीपादश्रीवल्लभ श्रीसद्गुरुश्रीदत्तात्रेयदेवताप्रीत्यर्थम् । अद्य अमुकदिनमारभ्य सप्तदिनपर्यंन्तम् श्रीगुरुचरित्रपाठाख्यं कर्म करिष्ये । तत्रादौ निर्विघ्नतासिद्‍द्ध्यर्थम् । महागणपतिस्मरणचं करिष्ये ।

वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं उरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा । श्रीमहागणपतये नमः ।

अथ ग्रन्थपूजा । पुस्तकरूपिण्यै सरस्वत्यै नमः गन्धपुष्पतुलसीदलहरिद्राकुंकुमाक्षतान् समर्पयामि ।

धूपदीपनैवेद्यं समर्पयामि ।

(नंतर उजव्या हाताने उदक सोडून पारायणास प्रारंभ करावा.)

ध्यान

मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे ।

मध्यस्थपाणियुगले डमरू-त्रिशूले ।

यस्यास्ति ऊर्ध्वकरयोः शुभशंखचक्रे ।

वन्दे तमत्रिवरदं भुजषट्‍कयुक्तम् ॥१॥

औदुंबरः कल्पवृक्षः कामधेनुश्च संगमः ।

चिंतामणीः गुरोः पादौ दुर्लभो भुवनत्रये ।

कृत जनार्दनो देवस्त्रेत्रायां रघुनन्दनः ।

द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद-श्रीवल्लभः ॥२॥

त्रैमूर्ति राजा गुरु तोचि माझा ।

कृष्णातिरी वास करून वोजा ।
सुभक्त तेथे करिता आनंदा ।

ते सुर स्वर्गी पाहती विनोदा ॥३॥

ध्यानमंत्र

ब्रह्मानंद्म परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।

द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥

एकं नित्यं विमलमचलं सर्वधीः साक्षिभूतम् ।

भावातीतं त्रिगुनरहितं सद्‍गुरुं तं नमामि ॥

काषायवस्त्रं करदंदधारिणं ।

कमंडलुं पद्मकरेण शंखम् ॥

चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं ।

श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥


शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत
श्री गुरु चरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी. कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदगमनाचा दिवस आहे.

श्री गुरु चरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैव्यद्य खाऊ घालावा

श्री गुरु चरित्र चे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी.

श्री गुरु चरित्राचे वाचन पहाटे ०३ ते सायंकाळी ०४ या दरम्यान करावे. दुपारी १२ ते १२.३० ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्या वेळेस पारायण वाचन बंद ठेवावे.

श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस (सकाळ ..संध्याकाळ) एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही.

श्री गुरु चरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये, स्वतः च्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्या ऐवजी नॉयलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रम्हचर्य पाळावे.

श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतः च्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरु चरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे, अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे.

सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरु चरीत्राच्या पोथीस नैव्यद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे.


​श्री गुरु चरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत

पहिला दिवस - अध्याय १ ते ९

दुसरा दिवस - अध्याय १० ते २१

तिसरा दिवस - अध्याय २२ ते २९

चौथा दिवस - अध्याय ३० ते ३५

पाचवा दिवस - अध्याय ३६ ते ३८

सहावा दिवस - अध्याय ३९ ते ४३

सातवा दिवस - अध्याय ४४ ते ५३

श्री गुरु चरित्र सप्ताह हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो. परंतु २१ दिवसात ३ पारायण ,४९ दिवसात ७ पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत. सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी १०.३० वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरु चरित्र ग्रंथ करिता नैव्यद्य मांडावा. ग्रंथाचा नैव्यद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा. व मगच आपण भोजन करावे. श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधी मध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नये. शक्य तोवर जमिनीवर झोपावे, पलंगावर झोपू नये.


​हे देखील जाणकारांना माहित असावे


पारायणाकरीता शास्त्रोक्‍त संकल्प- 
प्रथम आचमन करावे. आचमनाचे वेळी उजव्या हातावर पाणी घेऊन ॐ केशवाय नमः ॐ नारायणाय नमः ॐ माधवाय नमः म्हणून तीन वेळा पाणी (हातावरचे) नंतर दोन वेळा ताम्हणात पाणी सोडून, हात जोडून विष्णुंची खालील २४ नावे म्हणावीत.

 ॐ केशवाय नमः        
ॐ नारायण नमः       
ॐ माधवाय नमः 
       ॐ गोविंदाय नमः     
ॐ विष्णवे नमः      
ॐ मधुसुदनायनमः
ॐ त्रिविक्रमाय नमः     
ॐ वामनाय नमः     
ॐ श्रीधराय नमः  
ॐ ॠषीकेषाय नमः
ॐ पद्मनाभाय नमः
ॐ दामोदराय नमः
 ॐ संकर्षणाम नमः
ॐ वासुदेवाय नमः   
ॐ प्रद्युम्नाय नमः  
ॐ अनिरुद्धाय नमः
 ॐ पुरुषोत्तमाय नमः
अधोक्षजाय नमः  
ॐ नरसिंहाय नमः 
ॐ अच्च्युताय नमः
 ॐ जनार्दनाय नमः  
ॐ उपेन्द्राय नमः       
 ॐ हरये नमः  
ॐ श्रीकृष्ण परमात्मने नमः
प्राणायाम – प्रथम डावी नाकपुडी उजव्या हाताचे करंगळी शेजारचे दोन्ही बोटांनी बंद करावी व नंतर श्वास उजव्या नाकपुडीने आत घेऊन, डावी ना कपुडी अंगठ्याने दाबावी व मनात गायत्री मंत्र म्हणावा. श्वास सोडताना प्रथम डाव्या नाकपुडीवरील दोन्ही बोटे काढावी व नंतर उजव्या नाकपुडीवरील बोट काढून श्वास बाहेर सोडावा.

संकल्प – उजव्या हातात उदक (पाणी ) व अक्षता घेऊन खालीलप्रमाणे संकल्प करावा . त्याशिवाय इष्ट फल प्राप्त होत नाही हे लक्षात असावे. तसेही कोणत्याही उपासनेसाठी प्रथम संकल्प करावयासच हवा. संकल्प करण्यापूर्वी गुरू दत्तात्रेयांचे फोटोकडे/ पोथीकडे एकाग्र चित्ताने पाहावे व संकल्प म्हणावा. ‘‘ॐ तत्सत श्रीमद्भगवते महापुरुषस्य, विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य, अद्य ब्राह्मणो, द्वितीये परार्धे, विष्णुपदे, श्री श्वेत वाराह कल्पे, वैवस्वत मन्वन्तरे, अष्टविंशतितमे, युगचतुष्के, कलीयुगे, प्रथमचरणे, जम्बुद्विपे, भरतवर्षे, भरतखण्डे, दक्षिणापथे, रामक्षेत्रे बौद्धावतारे, दण्डकारण्ये देशे, गोदावर्याः दक्षिण तीरे, शालीवाहन शके… नाम संवत्सरे… अयने… ॠतो… मासे… पक्षे… तिथी… वासरे… दिवस नक्षत्रे… योगे… करणे… राशिस्थिते… वर्तमाने चन्द्रे… राशिस्थिते श्री सूर्ये… राशिस्थितेश्री देव गुरौ शेषेषु, ग्रहेषु यथायथं, राशिस्थानस्थितेषु, सत्सु एवंगुण विशेषणां, विशिष्टायां, शुभपुण्यतिथौ, मम आत्मनः, सकलशास्त्र, पुराणोक्‍त फलप्राप्तर्थं, मम, इह जन्मनि, जन्मजन्मान्तरे च, स्त्रि-पुत्र-पौत्र-धन-विद्या यश-आयुरारोग्याद्य भिष्ट कामनासिध्दिप्राप्तर्थ… पूजन (गुरुचरित्र पारायणं) अहं करिष्ये, आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं, महागणपति स्मरणं च करिष्ये ॥’’ असे म्हणून, हातातील उदक ताम्हणात सोडावे व नंतर हे पाणी तुळशीस टाकावे. रिकाम्या जागी पंचांगात बघून योग्य ते शब्द म्हणावेत. उपरोक्‍त संकल्प ज्यांना शक्य नसेल त्यांनी मराठीत देखील दिवस, वार, तिथी, स्थळ बोलून मनोकामना सिद्धीसाठी असे बोलून, संकल्प सोडला तरी चालतो

श्री गुरु चरित्र तीन दिवसीय वाचू नये. 
एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्र सेवेसाठी करावे.
 वैयक्तिक पारायण सात दिवसाचे करावे. 
श्री गुरुचरीत्राच्या निष्ठापूर्वक पारायण ने अनुभूती पूर्वक साक्षात्कार होतो. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. 
दुःखिताना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापिताना ,असाध्य आजार झालेल्यांना, पितृ दोष असणाऱ्यांना श्री गुरु चरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फल प्राप्ती देते असे सांगण्यात येते.

टिप : सेवेकऱ्यांसाठी ही माहिती देण्यात आली आहे. ही माहिती आपल्या जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात दिली जाते.

Featured post

श्री गुरुचरित्र पारायण

  गुरुचरित्र :  पारायणाच्या प्रारंभी करावयाचा संकल्प (प्रथम दोन वेळा आचमन करावे.) ॐ श्रीमन्महागणाधिपतये नमः । इष्टदेवताभ्यो नमः ...